केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांना ४,००० क्विंटल साखर साठ्याची मर्यादा लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग) मंगळवारी (दि. २८) नवे आदेश जारी केलेले आहेत. गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या दरवाढीनंतर व्यापाऱ्यांकडील साखरसाठ्यावर बंधने लागू केल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या आदेशानुसार साखरेचा कोणताही व्यापारी हा साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी तो साठा स्वतःकडे ठेवणार नाही. तसेच, देशभरात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी चार हजार क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण आदेश यात नमुद केला आहे. १ ऑगस्टपासून ३० नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील.

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी घोषित केलेल्या साखरेचा अपुरा कोटा आणि व्यापाऱ्यांवरील साठा मयदिचा प्रत्यक्ष परिणाम बाजारपेठेवर दिसून साखर दरवाढीस आणखी पोषक स्थिती निर्माण झाल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर आणखी कडाडले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकारे किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने साखरसाठ्याची माहिती व्यापाऱ्यांनी देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण अधिकारी अथवा जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडे साठा माहिती द्यायची किंवा शासनाने दिलेल्या पोर्टलवर ही माहिती देणे आवश्यक आहे, याची स्पष्टता लवकरच अपेक्षित आहे. सर्व विक्रेत्यांसाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या https:///foodstock.dfpd.gov.in/ या पोर्टलवर साखरेच्या साठ्याची स्थिती घोषित करणे आणि ती नियमितपणे अद्ययावत करणे अनिवार्य असेल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here