कोल्हापूर : केंद्र सरकारच्या श्रम संहितेविरोधात ऊसतोडणी, कंत्राटी कामगारांचे जेलभरो आंदोलन

कोल्हापूर : केंद्र सरकारने कामगारांना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या व कामगारविरोधी असलेल्या आणि मालकांच्या फायद्याच्या ४ श्रम संहिता २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू केल्या आहेत. त्यामुळे कामगारांना कायम नोकरीची हमी राहणार नाही, .याशिवाय, कामगार उपदान यांसारख्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. केंद्र सरकार ३२ पैकी २० योजना बंद करून बांधकाम कामगारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करत ऊसतोडणी, अंगणवाडी, आरोग्य स्त्री परिचर, यंत्रमाग कामगारांसह नगरपालिका, महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी जेलभरो आंदोलन केले. कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी जेलभरो आंदोलनाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सोमवारी दुपारी भरपावसात येथील दसरा चौकातून काढलेल्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कामगार, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कामगारांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधले. अंगणवाडी, आरोग्य स्त्री परिचर, यंत्रमाग कामगारांसाठी किमान वेतन कायद्याचा अंमल होत नाही. ऊसतोडणी कामगारांना अनेक कारखाने ठरलेला सेस देत नाहीत, घरेलू कामगार मंडळासाठी कायमस्वरूपी निधी मिळावा, घरकूल मेडिक्लेम, मुलांसाठी शिष्यवृत्तीच्या मागण्याही मांडण्यात आल्या. कामगार नेते भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, उदय नारकर, शिवाजी मगदूम, उज्ज्वला पाटील, आबासाहेब चौगुले, विवेक गोडसे, भगवान घेरडे यांच्यासह प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here