मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत येत्या 48 तासात मुसळधार पाउस पडणार आहे. यामुळे आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. एका अधिकार्याने सांगितले की, हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि शेजारच्या रायगड मध्ये मुसळधार पाउस पडणार आहे.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, क्रिडा आणि युवा कल्याण मंत्री आशीष शेंलार यांनी ट्वीट केले आहे की, मुबंई, ठाणे आणि कोकण क्षेत्रात मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.
मुंबईच्या हवामान खात्याचे डिप्टी डायरेक्टर जनरल के.एस. होसालिकर म्हणाले, मुंबई उपनगरात बुधवारी रात्री मुसळधार पाउस झाला होता. वर्सोवा मध्ये तीन तासात 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईशिवाय पालघर आणि ठाण्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे विमानसेवेला अडचणी येत आहेत. ट्रॅफिक जाम झालं आहे. आणि घरात पाणी घुसले आहे. जवळपास प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत मुसळधार पाउस पडतो.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.











