आयआरसीटीसी च्या भागविक्रीत 112 पटीने अधिक अर्जभरणा

नवी दिल्ली :  रेल्वे तिकिटांचे ई-आरक्षण तसेच रेल्वे प्रवाशांना खानपान व पेयजलाच्या पुरवठयाचा एकाधिकार असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयआरसीटीसीच्या प्रारंभिक भागविक्री प्रक्रियेने गुंतवणूकदारांचा मजबूत प्रतिसाद मिळविला आहे. चार दिवस सुरू राहिलेली ही भागविक्री गुरुवारी संपुष्टात आली आणि गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या समभागांसाठी 112 पटीने अधिक अर्ज भरले गेल्याचे आढळून आले.

या 100 टक्के सरकारी मालकीच्या कंपनीतील सरकारचा हिस्सा 12.4 टक्क्यांनी सौम्य होऊन 87.5 टक्क्यांवर येईल. हा सरकारी हिस्सा सौम्य करण्यासाठी कंपनीचे 2016 कोटी समभाग विक्रीसाठी खुले झाले होते. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांकडून 225 कोटींहून अधिक समभागांसाठी बोली लावण्यात आली, असे भांडवली बाजारांकडे उपलब्ध तपशिलावरून समजते. या भागविक्रीतून 645 कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांकडून 72 हजार कोटींहून अधिक मूल्याची बोली लावली गेली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here