कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. दाणोळी, शिरोळ या परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली पेटवून देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः शिरोळ व हातकंणगले तालुक्यात ऊसदराचे आंदोलन चिघळलं आहे. कर्नाटकमधील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनास हिंसक वळण लागल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
यामध्ये एक ट्रक्टर पेटवण्यात आला. तर सहा ट्रक्टरच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांकडून ऊस वाहतूक रोखण्यात आली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

















