सात कारखान्यांचा गाळप परवाना रोखला

कोल्हापूर, ता. 21 : -शासकीय भागभांडवलासह शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखून धरला आहे, तर विभागातील सात-कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्जच केलेला नाही. कारवाई करण्यात आलेल्या काही कारखान्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांतील एफआरपीची रक्कम दिलेली नाही.

विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. परिणामी यावर्षीच्या साखर हंगामाचे धोरणच अजून ठरलेले नाही. दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हंगाम कधी सुरू करायचे, इथंपासून ते एफआरपी संदर्भातील निर्णय होतो, पण यावर्षी ही बैठकच झालेली नाही. मंगळवारी (ता. १९) राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर सहकार सचिव आभा शुक्ला आदींशी चर्चा करून शुक्रवारपासून हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

परवाने रोखलेले कारखाने ( आज 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत)
उदयसिंगराव गायकवाड-बांबवडे
रिलायबल शुगर्स
मंडलिक- हमीदवाडा
नलवडे-गडहिंग्लज
कुंभी-कुडित्रे
दौलत-हलकर्णी
केन ॲग्रो-चंदगड

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here