पंजाब: 69 कोटीं थकबाकी न मिळाल्याने ऊस उत्पादकांनि नोंदवला निषेध

फागवारा (पंजाब) : 69 कोटी रुपये थकबाकी न भरल्याच्या विरोधात ऊस उत्पादकांनी आज फगवारा येथील साखर कारखान्याला घेराव घातला. युनियन दोआबाचे अध्यक्ष मनजितसिंग राय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शकांनी कारखाना व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली.

निषेधाच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांसोबत झालेल्या कुरबुरीनंतर आंदोलकांनी साखर कारखान्यात जबरदस्तीने घुसखोरी केली.

फागवारा एसडीएम गुरविंदरसिंग जोहल यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलनकर्त्यांचा हा निषेध आटोक्यात आला. एसडीएम म्हणाले की, उपायुक्त दिप्ती उप्पल आणि कपूरथळाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सतिंदर सिंह येत्या काही दिवसात ऊस उत्पादकांना भेटून लवकरच त्यांच्या समस्या सोडवतील. शेतकऱ्यांना नियमित त्यांचे पैसे मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here