साओ पाउलो : ब्राजीलच्या साओ पाउलो चे गवर्नर जोआओ डोरिया यांनी एका उद्योग सम्मेलनात सांगितले की, साखरेवरील निर्बंध जितके सैल ठेवले जातील तेवढी ती ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल.
जोआओ डोरिया यांनी दुबई मध्ये झालेल्या तीन दिवसीय उद्योग बैठकीत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बाजारात साखर सर्वाधिक संरक्षीत उत्पादन आहे, यामुळेच करा सारखे अडथळे कमी केल्यास चांगला पैसा साखर मिळवून देईल. यामुळे उत्पादकांना चांगल मार्जिन राहिल आणि ग्राहकांनाही कमी किमतीत साखर मिळेल. बाजील जगातील सर्वात मोठा साखर निर्यातक आणि दूसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे.
डोरिया म्हणाले, ऊस उत्पादन करणााऱ्य सर्व देशांनी इथेनॉल चे उत्पादन करायला हवे, त्यामुळे अतिरिक्त साखरेची समस्या कमी होऊन साखर उद्योगाला अर्थिक फायदा ही होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.