कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील तुंरबे-कासारवाडा मार्गावरील बाळासो बलुगडे यांच्या ऊसाच्या शेताला अचानक आग लागली. मोठ्या कष्टाने वाढवलेलं उभं पीक जळताना पाहून शेतकरी बाळासो बलुगडे यांचा जीव तळमळला. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. आग इतकी भडकली होती की तिने शेतकऱ्याचाही बळी घेतला.
आग विझवण्यासाठी ऊसाच्या शेतामध्ये गेलेले बाळासो बलुगडे हेच आगीच्या भक्ष्यस्थानी आले. आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. काबाडकष्ट करून वाढवलं पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपल्या जीवालाच मुकावं लागलं.
बाळासो बलुगडे यांच्या मृत्यूने तुंरबे-कासारवाडा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एका क्षणात सर्व होत्याचं नव्हतं झाल्याने बलुगडे कुटुंबाने मोठा आक्रोश केला.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.