झबरेड़ा(उत्तरांचल): इकबालपुर साखर कारखान्याने सोमवारी पांच करोड़ रुपयांची थकबाकी भागवली आहे. तसेच शेतकऱ्यांना 31 जानेवारी पर्यंतचे पैसे देखील मिळतील.
इकबालपुर साखर कारखान्यात सध्याच्या गाळप हगामात संयुकत खात्याची व्यवस्था केली गेली आहे. या अंतर्गत सहायक ऊस आयुक्त तसेच साखर कारखान्याचे अर्थ नियंत्रक यांच्या संयुक्त सहीनेच खाते उघडण्यात आले आहे. यामध्ये साखर,मोल्यसिस त्याची विक्री झाल्यानंतर त्याचे पैसे जमा होत आहेत.
यानंतर या पैशातूनच शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे भागवण्यात येत आहेत. इकबालपूर साखर कारखान्याचे प्लांट हेड सुरेश शर्मा म्हणाले की, कारखान्याकडून ऊस समितीला पाच करोड 52 लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे. या पैशातून शेतकऱ्यांना 31 जानेपर्यंत पुरवठा केलेल्या ऊसाचे पैसेही मिळतील. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी कारखान्यांना एकदम स्वच्छ आणि ताज्या ऊसाचा पुरवठा करावा. कारखान्याकडून शेतकऱ्यांना सॅनिटायझेशन ची सोय करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांनी मास्क वापरावा असेही सांगण्यात आले आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.