पलवल :येथील साखर कारखान्याच्या गोदामाला शुकवारी दुपारी १ वाजता लागलेल्या आगीत १० ते १२ करोड रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. फायर ब्रिगेडच्या 7 गाडया मोठया प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यशस्वी झाल्या. शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारखाना व्यवस्थापनाने आग लागण्याचे कारण आणि आगीमुळे झालेले नुकसान समजणसाठी तपासणी सुरू केली आहे.
गोदामामध्ये आग लागलेली दिसून आल्यावर लगेचच फायर ब्रिगेड ला सूचना दिली. फायर ब्रिगेड च्या 7 गाडया लवकर घटनास्थळी पोचल्या आणि जवळपास एक -दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या आगीत हजारो क्विंटल साखर पाण्यामुळे खराब झाल्याची शक्यता आहे. आगीमुळे किती नुकसान झाले याच्या तपासणीसाठी समिती गठीत करण्यात येणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.