लॉकडाउन: ट्रान्सपोर्टर्सना सरकारकडून ड्रायव्हरना विम्याचे सौरक्षण मिळण्याची आशा

नवी दिल्ली: कोरोना वायरसशी लढण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आणि याचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन सारखे पाउल उचलले आहे. या दरम्यान सरकार हादेखील प्रयत्न करत आहे की, आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होवू नये.

ट्रान्सपोर्टर्सच्या ग्रुप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) यांनी सांगितले की, ग्रुपने सरकारबरोबर अनेक मुद्दे चर्चेला घेतले आहेत, यामध्ये ट्रक ड्रायव्हर्स आणि त्यांचे सहकारी यांना विमा उतरवण्याबाबतचा मुद्दाही आहे.एआयएमटीसी यांनी सांगितले की, कोरोना वायरस च्या भितीमुळे ड्रायव्हर पुन्हा कामावर येण्यास तयार नाहीत.

एआयएमटीसी ही देशाची प्रमुख संस्था आहे, जी जवळपास 95 लाख ट्रक ड्रायव्हर आणि संस्थांचे प्रतिनिधीत्व करत आहे. संस्थेचे अध्यक्ष कुलतरन सिंह अटवाल यांनी सांगितले की, आज एका बैठक़ीत अधिकार्‍यांशी टोल मध्ये सूट आणि डीजेल चे दर कमी करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांनी सांगितले की, आवश्यक सेवांच्या वाहतुकीच्या संदर्भात गृह मंत्रालयाने निर्देश दिलेले असूनही काही अधिकार्‍यांनी वाहन चालकांना त्रास दिला, तसेच त्यांना थांबवण्याच्या घटनाही घडल्या. ट्रान्सपोर्टर्सनी सरकारकडे दिलासा पॅकेजची मागणी केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक ड्रायव्हरला 15,000 रुपये द्यावेत असे नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here