गंगा किसान (मोरना) साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण

मुजफ्फरनगर : दि गंगा किसान सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामा दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. यामुळे कारखाना अनेकदा बंद राहिला. तरीही हंगामाच्या समाप्तीपर्यंत 51 लाख 30 हजार 864 क्विंटल ऊसाचे गाळप करुन कारखान्याने गेल्या वर्षातील रेकॉर्ड तोडले.

मुख्य व्यवस्थापक एचवी कौशिक यांनी सांगितले की, शेतकरी आणि संचालक मंडळाच्या मागणीनंतर अनेक दिवसांपर्यंत फ्री पावत्या देवून ऊस घेतला गेला. मंगळवारी कारखान्याचा गाळप हंगाम संपला. या हंगामात 226 दिवस कारखाना सुरु राहिला. 51 लाख 30 हजार 864 क्विंटल ऊसाचे गाळप झाले, जे गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत सर्वात अधिक आहे. यावेळी कारखान्याने 5 लाख 55 हजार पोती साखरेचे उत्पादन केले. कारखान्याची रिकवरी 10.90 टक्के राहिली. या प्रसंगी यूपी सहकारी साखर मिल असोसिएशन सहारनपुर विभागाचे संचालक डायरेक्टर देवेंद्र चौधरी, ऊस विकास परिषदेचे चेअरमन अजय कुमार, शेतकरी नेते रामपाल सिंह, कारखाना संचालक मनोज राठी, अरुण कुमार, सुधीर कुमार, कंवर पाल, रजत राठी, सतबीर आदींनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here