दुबई तील साखर रिफाइनरी चांगल्या मागणीमुळे पूर्ण क्षमतेने सुरु

दुबई : कमी मागणी आणि घसरणार्‍या किंमती यांनी साखर उद्योगाची समस्या वाढवली आहे. पण या स्थितीतही दुबई येथील दिग्गज साखर रिफाइनरी अल खलीज वर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. उलट त्यांच्याकडे वाढलेल्या मागणीमुळे रिफाइनरी पूर्ण क्षमतेने सुरु आहे. अल खलीज साखर रिफायइनरी चे प्रमुख निदेशक जमाल अल घुरैर यांच्यानुसार, जगातील सर्वात मोठे बंदरगाह आधारीत अल खलीज साखर रिफाइनरी पुढच्या तीन महिन्यांसाठी प्रति दिन 7,000 टन इतक्या पूर्ण क्षमतेने सुरु राहण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, थाइलंडमध्ये दुष्काळामुळे मागणी वाढली आहे.

अल घुरैर म्हणाले, साखरेच्या मागणीच्या आधारावर आम्ही आमची कराराची जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करू.आणि पुढच्या तीन महिन्यांपर्यंत रिफाइनरी पूर्ण क्षमतेने सुरु राहील. थायलंडमधील दुष्काळामुळे त्यांच्या क्षमतेत संभाव्य घट झाल्याने आम्हाला चांगली संधी दिली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here