एफआरपीची विभागणी महागात पडेल

खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर, दि 8 सप्टेंबर 2018: एकीकडे एफआरपीची रक्कम चौदा दिवसात द्यावी असा कायदा केला आहे. तरीही शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी पी दिली जात नाही आणि दुसरीकडे सरकारने या एफआरपी चे तुकडे केले आहेत हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सरकारला हा निर्णय महागात पडू शकतो असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाची एफआरपी देत असताना एक रकमी न देता त्याचे विभाग करावेत असा निर्णय सरकारने सर्व साखर कारखान्यांना लागू करावा असे पत्र पाठवले आहे. याबाबत खासदार राजू शेट्टी कोल्हापूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. साखर कारखान्याने कायद्याप्रमाणे एक रकमी आणि 14 दिवसात या पार्वती संपूर्ण रक्कम दिली पाहिजे. मात्र सरकारनेच ठरवून दिल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावे असे संगीतले आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय तोट्याचा ठरणार आहे.
खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना कष्टाचे मोबदल्यात अपेक्षित दर मिळत नाही, तरीही पर्याय नाही म्हणून त्यांना शेत करावी लागत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन सरकार शेतकऱ्यांवर चुकीचे निर्णय लागत आहे. यापैकी एफआरपीमध्ये हस्तक्षेप करून या पार्टीची तुकडे करत आहे. वास्तविक ११ महिन्यांपासून १८ महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊस शेतात उभा असतो दीड वर्ष त्यामध्ये शेतकऱ्याने गुंतवणूक केलेली असते. त्याचे व्याजही भरावे लागते. अशा परिस्थितीत ‘एफआरपी’चे तुकडे पडल्यास शेतकरी संघटना शांत बसणार नाही असाही इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here