बाजपूर : सहकारी साखर कारखान्यांमध्ये कर्मचारी आऊटसोर्सिंगने भरण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलनात उतरलेल्या पाच ट्रेड युनियनशी संलग्न कर्मचाऱ्यांनी डेहराडूनमध्ये ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. ऊस मंत्र्यांनी राज्याच्या सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांना चर्चेला बोलावले आहे.
शुक्रवारी समाज कल्याण परिवहन मंत्री यशपाल आर्य यांनी बाजपुर साखर कारखान्याच्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी ऊस मंत्र्यांशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर ट्रेड युनियनच्या कामगार नेत्यांनी मंत्र्यांची डेहराडूनमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी ऊस मंत्र्यांशी इथेनॉल प्लांट सुरू करणे, १२ जूनचे सरकारचे आदेश कामगारांच्या हितासाठी रद्द करावेत, फिटमेंट प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, योग्यतेनुसार पदोन्नती द्यावी, रिक्त पदे भरावीत अशी मागणी केली.
यावेळी काहीजण कारखाना मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कामगारांनी सांगितले. कामगार नेता विरेंद्र सिंह यांनी सांगितले की, मंत्र्यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी चर्चेत जॅकव, गेंदराम, अभय कुमार, राजकुमार, गुरमीत सिंह, उग्रसेन आदी उपस्थित होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link















