नवी दिल्ली : भारतामध्ये १,००० कोटी रुपये एकूण संपत्ती असलेले एक हजाराहून अधिक श्रीमंत आहेत. हारुण इंडियाच्या नव्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आयआयएफएल वेल्थ हारुण इंडिया रीच लिस्ट २०२१ अनुसार, ११९ शहरांतील १००७ लोकांकडे १,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.
अहवालात म्हटले आहे की, या एकत्रित संपत्तीमध्ये ५१ टक्के वाढ झाली आहे. तर सरासरी संपत्तीमध्ये २५ टक्के वाढ झाली. याशिवाय ८९४ जणांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली अथवा ती आहे तशीच राहिली. यामध्ये २२९ जण नवश्रीमंत आहेत. तर ११३ जणांच्या संपत्तीमध्ये घट झाली. तर ५१ जण यादीतून बाहेर पडले आहेत.
सध्या भारतात २३७ अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये ५८ जणांची वाढ झाली. या यादीत रसायन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील नव्या लोकांचा समावेश आहे. त्यातही फार्मा सेक्टर आघाडीवर आहे. या क्षेत्रातील नवे १३० अब्जाधीश आहेत. या यादीत २३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. अहवालात म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे ७,१८,००० कोटी रुपये संपत्तीसह सलग दहाव्या वर्षीही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ५,०५,९०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह गौतम अदानी परिवार दोन क्रमांकाने वधारुन दुसऱ्या स्थानी पोहोचले आहे. अदानी ग्रुप समुहाचे बाजारमूल्य ९ लाख कोटी रुपये आहे. एचसीएलचे शिव नादर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे हारुन इंडिया लिस्टचे एमडी अनस रहमान जुनैद यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link















