अहिल्यानगर : उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने थोरात सहकारी कारखान्याच्या कर्मचारी, अधिकारी व कार्यकर्त्यांनी असे एकूण १०१ जणांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.कारखान्याच्या अतिथीगृह येथे अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर झाले.
याप्रसंगी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, संचालक नवनाथ आरगडे, विजय राहणे, मदन आंबरे, योगेश भालेराव, अरुण वाकचौरे, गुलाब देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्यालयीन अधीक्षक कृष्णा दिघे, अनिल पाटोळे, अर्पण रक्तपेढीच्या प्रियांका वनवे, धनाजी माने, श्रद्धा जोगदंड, ज्ञानेश्वर खैरनार उपस्थित होते.
सहकारमहर्षी थोरात यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेर तालुक्यात १२ जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कारखाना कर्मचाऱ्यांच्या वतीने १०१ जणांनी रक्तदान केले असून यामध्ये कारखाना सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांनी आतापर्यंत जीवनात १०१ वेळा रक्तदान केल्याचा योगायोग झाला आहे. यावेळी माजीमंत्री थोरात यांनी मोहन मस्के यांचा सत्कार केला.
















