अहिल्यानगर : कृषिनाथ कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन, गव्हाण पूजन उत्साहात

अहिल्यानगर : माळकूप (ता. पारनेर) येथील कृषिनाथ ग्रीन एनर्जी कारखाना बॉयलर अग्निप्रदीपन, गव्हाणपूजन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत, प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषिनाथचे अध्यक्ष महेश करपे, कार्याध्यक्ष रवींद्र भुजबळ, उपाध्यक्ष अनिल मोहित, कार्यकारी संचालक प्रकाश मते, डॉ.प्रदीप दाते, संचालक नरेश करपे आदी उपस्थित होते. यावेळी पोपटराव पवार यांनी पारनेरच्या दुष्काळी माळरानावर कृषिनाथ कारखान्याने सहकाराच्या बळावर शेतकऱ्यांचे स्वप्न साकार केले आहे. पाणी टंचाईवर मात करत साखर, इथेनॉल, वीज आणि सीएनजी निर्मितीच्या नावीन्यपूर्ण मार्गाने कारखाना शेतकऱ्यांच्या प्रगतीचा पाया रचत असल्याचे सांगत कारखान्याच्या कामगिरीचे कौतुक केले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष महेश करपे यांनी नोव्हेंबरपासून गळीत हंगाम चालू होणार आहे. यंदा साडेतीन लाख मेट्रिक टन गाळपाचे लक्ष्य ठेवल्याचे असे सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांबरोबर भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. साखर, इथेलॉन बरोबर वीजनिर्मिती प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होणार आहे. अडीच हजार टन उस गाळप, ६० हजार लिटर इथेलॉन निर्मिती व सहा मेगावॅट वीजनिर्मिती या प्रकल्पात होणार आहे. सभापती अनिल भुजबळ, माजी सभापती गंगाराम बेलकर, डॉ. पोपट मते, सरपंच लीलाबाई रोहकले, सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, भारत केळेकर, डॉ. वंदना मते, कविता बनकर, भाऊसाहेब आव्हाळे, जयदीप जोशी, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here