अहिल्यानगर : १० लाख टन ऊस गाळप करून ज्ञानेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

अहिल्यानगर : ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सहकारात ऊस गाळपात जिल्ह्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. यंदा कारखान्याने १० लाख टन ऊस गाळप करून गळीत हंगामाची यशस्वी सांगता केली. कारखान्याने ४ कोटी युनिट वीज निर्यात केली असून आतापर्यंत १ कोटी ८० लाख लीटर इथेनॉल तयार केले आहे. कारखाना आता सर्वदृष्टीने परिपूर्ण झाला असून, यापुढील काळात कुठलाही भांडवली खर्च नाही. वेळेत ऊस तोडणी करून प्रतिटन ३,००० रुपये याप्रमाणे ऊस पेमेंट वेळेतच शेतकऱ्यांच्या बँक खाते वर्ग केले गेले. पुढील काळातही ऊस दर देण्यात कारखाना कायमच अग्रेसर राहील, अशी ग्वाही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली. भेंडा येथे कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते.

साखर व इथेनॉलचे दर वाढून मिळावेत, यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे असे नरेंद्र घुले-पाटील यांनी सांगितले. यावेळी मुकादम, मजूर, वाहतुकदार, ठेकेदार ऊसतोड यंत्र मालक, यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक ॲड.देसाई देशमुख यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बबनराव भुसारी यांनी आभार मानले. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ झाला. संचालक काकासाहेब शिंदे, काशीनाथ नवले, प्रा. नारायण म्हस्के, शिवाजीराव कोलते, मच्छिंद्र म्हस्के आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here