अहिल्यानगर : केंद्र सरकारने साखर विक्री दर, इथेनॉल खरेदी दरात वाढ करावी – बिपीन कोल्हे यांची मागणी

अहिल्यानगर : सहकार क्षेत्राला अनेक बंधनांना सामोरे जावे लागते. मात्र तसे खासगी साखर कारखानदारीचे तसे नाही. त्यामुळे अनेक जटील प्रश्न निर्माण होत आहेत. भविष्यात साखर उद्योगासह सहकाराला प्रगतीच्या दिशेने घेवुन जातांना केंद्र व राज्य शासनाला अनेक कटु निर्णय घ्यावे लागतील, असे मत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाची सांगता कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. केंद्र सरकारने एफआरपी अगोदर तातडीने साखर विक्री दरात व इथेनॉल, सहवीज निर्मिती खरेदी दरात वाढ करावी, तरच हा उद्योग टिकेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

बिपीन कोल्हे म्हणाले की, बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सगळ्या उद्योगापुढे स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. त्यात साखर उद्योगही मागे नाही. मात्र सहकारासमोर खासगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तेव्हा केंद्र व राज्य शासनाने सहकार व त्यावर अवलंबुन असणारे ग्रामीण अर्थकारण टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने साखर उद्योगाचा अभ्यासक गेला. त्यांनी साखर कारखान्यांच्या उत्कर्षासाठी काळानुरूप पावले उचलत काम केले. सांगता समारंभत अध्यक्ष बिपिन कोल्हे, संचालक निलेश देवकर, सोनल देवकर यांच्या हस्ते झाला. संचालक विश्वास महाले, अरुण येवले, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव वक्ते, नगराध्यक्ष पराग संधान, संजय होन, प्रदिप नवले, बाळासाहेब वक्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here