अहिल्यानगर : सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचा सीएनजी प्रकल्प सहकारात आदर्शवत – अध्यक्ष विवेक कोल्हे

अहिल्यानगर : संजीवनी उद्योग समूह अंतर्गत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेला सीएनजी प्रकल्प हा सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरला आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचा सीएनजी प्रकल्प सुरू करणारा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. भविष्यातील संभाव्य आव्हानांचा विचार करता भारताने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे, असे मत कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले. या सीएनजी प्रकल्पामधून दररोज सुमारे १२ टनापर्यंत सीएनजी उत्पादन करण्याची क्षमता उपलब्ध आहे. उसाची उप उत्पादने ऊर्जा निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता बनत आहे, असे ते म्हणाले.

विवेक कोल्हे म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल आणि सीएनजीसारखे इंधन परदेशातून आयात केले जाते. विशेषतः स्ट्रीट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून मोठ्या प्रमाणावर इंधन भारतात येते. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारीनुसार जवळपास ५५०० जहाजांमधून इंधन भारतात आयात करण्यात आले असून त्यासाठी सुमारे १५,००० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here