अहिल्यानगर : जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाची बिले दिलेली नाहीत. याशिवाय, ज्या साखर कारखान्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले आहे,अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये,अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. याबाबत, प्रादेशिक सहसंचालक व जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना निवेदन दिले आहे. याबाबत दि. १४ ऑगस्ट रोजी शेतकरी संघटना साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक,प्रभाकर कांबळे,साहेबराव चोरमल आदींच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने ऊस गाळपास आल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट देणे बंधनकारक आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी नियमांचे पालन केले नाही.वेळेत ऊस बिल दिलेले नाही. अशा कारखान्यांतील कायद्याचा भंग केला आहे.एफआरपी थकीत असलेल्या आणि कामगारांचे वेतन थकीत ठेवणाऱ्यांना यावर्षी गळीत हंगामाची परवानगी देऊ नये.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.


















