अहिल्यानगर : आगामी चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून श्रीगोंदे तालुक्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी आमदार राहुल जगताप व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश करीत सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या पुढील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाजीराव नागवडे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस व कुंडलिकराव जगताप सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
विवेक पवार यांचा प्रवेश येत्या काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे, तर भोस यांचा प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणानंतरच जाहीर झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदार राहुल जगताप व ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी बाबासाहेब भोस विवेक पवार साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुढे येत होती. त्यांनी मंगळवारी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पवार यांची भेट घेतली. आता जगताप गटाकडून विवेक पवार यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आहेत. मात्र, तालुक्याच्या राजकारणात ते नागवडे कुटुंबासोबत आहेत. भोस हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. भोस यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास तो राजेंद्र नागवडे यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. बाबासाहेब भोस हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.