अहिल्यानगर : येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या वतीने नेवासा बुद्रुक येथील सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमात ऊस पीक परिसंवाद व शेतकरी मेळावा झाला. यावेळी ऊस पिक शास्रज्ञ सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.डॉ. नरेंद्र घुले पाटील अध्यक्षस्थानी होते. शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत, योग्य वाणाची निवड व लागवड पद्धत, खत आणि पाणी व्यवस्थापन करून एकरी ५० हजार ऊस संख्या ठेवली तर एकरी १०० टन ऊस उत्पादन मिळू शकते. त्यासाठी जमिनीची जैविक, भौतीक व रासायनीक सुपिकता चांगली असावी, असे मत कृषीतज्ज्ञ सुरेश माने यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञाचा वापर करून उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे. आमदारकीच्या माध्यमातून प्रवरा नदीवर मध्यमेश्वर बंधारा केल्याने शेतीला पाणी मिळत आहे, वीज उपकेंद्रे उभे केले. त्यामुळे पूर्ण दाबाने वीज मिळत आहे. तर महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, की नेवासाचा आज जो हिरवागार शिवार दिसतोय त्याचे सर्व श्रेय नरेंद्र घुले पाटील व मधमेश्वर बंधाऱ्याला आहे. संचालक काकासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब गंडाळ यांनी स्वागत केले. काशिनाथ नवले यांनी आभार मानले. हिम्मतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के, मुख्य शेतकी अधिकरी सुरेश आहेर, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, शंकरराव लोखंडे, संभाजी पवार, सुनील वाघ, बाळासाहेब पाटील, प्रकाश जाधव, अंबादास कळमकर, बाळासाहेब धोंडे, संभाजीराव माळवदे, सर्जे राव चव्हाण, हुकुमबाबा नवले, गटविकास अधिकारी सुरेश कार्ले, बाळासाहेब पाटेकर आदी उपस्थित होते.