अहिल्यानगर : थोरात कारखान्याकडून यंदा ३२०० रुपये प्रति टन दराची माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची घोषणा

अहिल्यानगर : साखर कारखान्यात दरवर्षी किमान नऊ लाख मेट्रिक टन गाळप होणे गरजेचे आहे. थोरात कारखान्याने १५ लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. कारखान्याने कायम चांगली वाटचाल केली आहे. यावर्षी थोरात कारखाना प्रतिटन ३२०० रुपये भाव देणार असल्याची घोषणा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. कारखान्याच्या सन २०२५- २६ या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. सुधीर तांबे होते. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी त्यांनी केली.

माजी मंत्री थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्याला काही लोक बदनाम करत असून खोट्या नाट्या केसेस टाकल्या जात आहेत. बाहेरच्या संदेशावर ते काम करत आहेत. सर्वांनी तालुक्याची वाटचाल जपण्यासाठी कटिबद्ध रहा, असे आवाहन त्यांनी केले. वार्षिक सभेला व्यासपीठावर ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, सरपंच निर्मला राऊत, संचालक संतोष हासे, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लताताई गायकर, सुंदराबाई डूबे, बंडूनाना भाबड, मदन आंबरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here