अहिल्यानगर : माजी मंत्री थोरात यांनी साडेसहा हजार विद्यार्थ्यांना दिले साखर कारखानदारीचे धडे

अहिल्यानगर : संगमनेर शहरासह तालुक्यातील श्रमिक महाविद्यालय, पानवडी येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, अमृतवाहिनीतील विविध शाळा आणि शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शेतातून आलेला ऊस ते उत्पादित होणारी साखर, अल्कोहोल, वीज निर्मिती या प्रक्रियांचा अभ्यास थोरात साखर कारखान्यामध्ये केला. दूध प्रक्रिया आणि त्यावरून तयार होणाऱ्या उपपदार्थांचा अभ्यासही केला. तालुक्यातील ६,७९० विद्यार्थ्यांनी सहकार क्षेत्राची माहिती घेतली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना सहकारी सहकारी संस्थांचे कामकाज समजावून सांगितले. शेतातून साखर, दूध, वीज आणि उपपदार्थ तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधीही दिली.

या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते. अमृतवाहिनीतील इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, एमबीए, फार्मसी, डेंटल कॉलेज या शिक्षण संस्थांनाही विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. तालुक्याला मोठी समृद्ध व संस्कृत परंपरा आहे. ही परंपरा जपत तरुण पिढीने विविध क्षेत्रात येणारे नवीन एआय तंत्रज्ञान अभ्यासणे गरजेचे असून चांगल्या गुणवत्तेतून काम करत आपल्या कुटुंबाचा, गावाचा व तालुक्याचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here