अहिल्यानगर : गणेश कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदी जी. बी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. संचालक मंडळाच्या उपस्थितीत कारखान्याचे मार्गदर्शक युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. कोल्हे म्हणाले, संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख शेतकी अधिकारी म्हणून कार्यरत असताना शिंदे यांनी उत्तम काम केले. त्यांची कामाची हातोटी, तंत्रज्ञानाशी सुसंगत दृष्टिकोन त्यांच्याकडे असल्याने त्याचा फायदा गणेश कारखान्याला होईल. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेले काम लक्षात घेऊन त्यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यासाठी आपण आग्रह धरला होता.
गणेश परिसराच्या दृष्टीने कारखान्याला एक वेगळे महत्त्व आहे. मागील दोन हंगामांमध्ये उत्तम गाळप झाल्यामुळे कारखान्याची विश्वासार्हता वाढली. कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे यांच्या नियुक्तीमुळे ‘गणेश’ची वाटचाल आणखी सुकर होण्यास मदत होईल. यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, ज्येष्ठ संचालक अॅड. नारायण कालें, सर्व संचालक मंडळ, कोल्हे कारखान्याचे जनरल मॅनेजर शिवाजी दिवटे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे एम. डी. घुगरकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.