अहिल्यानगर : संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू २०२५-२६ गळीत हंगामात एक लाख ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. साखर कारखाने हे केवळ औद्योगिक केंद्र नसून शेतकरी, मजूर व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केले. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १ लाख १११ व्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू आदी उपस्थित होते.
मते म्हणाले, की केदारेश्वर कारखान्याने अल्पावधीत विश्वासार्हता निर्माण केली असून, भविष्यात यापेक्षा अधिक ऊस गाळप होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठे बळ मिळेल. ग्रामीण भागाच्या अर्थचक्राला गती देणारा कारखाना म्हणून केदारेश्वरची ओळख निर्माण झाली आहे. कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, ज्येष्ठ संचालक त्रिंबक चेमटे, शिवाजी जाधव, तज्ज्ञ संचालक आयुबभाई शेख, प्रकाश दहिफळे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, चीफ इंजिनिअर प्रवीण काळुसे, चीफ केमिस्ट रामनाथ पालवे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे आदी उपस्थित होते.

















