अहिल्यानगर : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जी दिशा दाखविली त्यावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे व शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून कारखान्याने देशात सर्वप्रथम बायो सी.एन. जी. प्रकल्प उभारला.ऊस भावात आपला कारखाना कधीही मागे राहणार नाही अशी ग्वाही युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. दीडशे रुपये वाढीव दराची घोषणाही त्यांनी यावेळी केली. उसाची सर्वाधिक लागवड व्हावी यासाठी कारखान्यांने एकशे एक मे. टनापेक्षा जास्त ऊस उत्पादक सभासद शेतक-यांना ७१ हजार रूपये रोख व बुलेट गाडी बक्षिसासह अन्य रोख पारितोषकांची योजना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी जाहीर करताच उपस्थितांनी दाद दिली.
कोल्हे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर पार पडली याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे होते. अहवाल सालात जादा उस उत्पादन घेतलेल्या काशिनाथ शिंदे करंजी, सोमनाथ जाधव शहाजापुर, विष्णु सुराळकर येसगाव, गयाबाई महाले शहाजापुर, सुमनबाई कोळपे कोळपेवाडी या शेतक-यांसह अवर सचिव किरण शिंदे, वयोवृध्द शेतकरी दशरथ वहाडणे व अन्य मान्यवरांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.
प्रारंभी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी स्वागत केले. बिपीन कोल्हे म्हणाले, मंत्री विखे यांनी गोदावरी कालवे नूतनीकरणात निधी देवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. विषय पत्रीकेवरील सर्व विषय मंजूर करण्यांत आले. या प्रसंगी दत्तात्रय कोल्हे, संजीवनी सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संचालक त्र्यंबकराव सरोदे, शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, पांडुरंगशास्त्री शिंदे अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाजीराव मांजरे, मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर उपस्थित होते. सुत्रसंचालन संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले.