अहिल्यानगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी उत्पादन हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते झाली. सन २०२४-२५ या उत्पादन हंगामात प्रतिदिन एक लाख लिटर उत्पादन क्षमतेच्या आरएस प्रकल्पामधून २३० दिवसांत १ कोटी ८० रेक्टिफाइड स्पिरिट (आरएस) तर प्रतिदिन १ लाख लिटर उत्पादन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पामधून २२६ दिवसांत १ कोटी ७२ लाख इथेनॉल निर्मिती करण्यात आली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील व कार्यकारी संचालक अनिल शेवाळे म्हणाले, की डिस्टिलरी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी इंजिनियरिंग-बॉयलर विभाग व रसायन विभागाच्या सहकार्याने इथेनॉल उत्पादनाचे लक्ष पूर्ण केले. यावेळी सचिव रवींद्र मोटे, डिस्टिलरी इंचार्ज महेंद्र पवार, तांत्रिक सल्लागार एम. एस. मुरकुटे, एस. डी. चौधरी, मुख्य अभियंता राहुल पाटील, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, सिनियर डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव फुलारी, उपमुख्य अभियंता नंदकुमार चोथे, डिस्टिलरी विभागाचे सिनियर डिस्टिलरी केमिस्ट कृष्णा बारगुजे, अजय गडाख यावेळी उपस्थित होते.