अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे-पाटील यांची निवड

अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी उपाध्यक्षपदी सोपान शिरसाठ यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे उपस्थित होते.

अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीसाठी संचालकांच्या विशेष बैठकीत डॉ. विखे यांच्या नावाची सूचना संचालक सुनील तांबे यांनी मांडली. संचालक अशोक घोलप यांनी अनुमोदन दिले. शिरसाठ यांच्या नावाची शिफारस किरण दिघे यांनी मांडली. संचालक अनिल भोसले यांनी अनुमोदन दिले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कारखान्याने आव्हानात्मक परिस्थितीत सभासदांना चांगला भाव दिला आहे. आता शेतकरी सभासदांच्या हितासाठी चांगले काम करा. संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जनसेवा मंडळाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आभार मानले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचे भाषण झाले. नूतन अध्यक्ष डॉ. विखे पाटील यांनी आभार मानले. ज्येष्ठ मार्गदर्शक आबासाहेब खर्डे, कैलास तांबे, डॉ. भास्करराव खर्डे, तुकाराम बेंद्रे, अण्णासाहेब भोसले, अण्णासाहेब कडू, नंदकिशोर राठी, सुनील जाधव, मच्छिंद्र थेटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here