अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार अशोक काळे व अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला. शंकरराव चव्हाण यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी शिंदे यांची निवड करण्यात आली.
नूतन उपाध्यक्ष प्रवीण शिंदे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्यांवर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले. त्यामुळे आमचे कुटुंबातील सदस्यांना यापूर्वी दोन वेळेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. माझ्या कुटुंबातून मी तिसऱ्यांदा ही जबाबदारी सांभाळणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप बोरनारे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम, सुनील मांजरे, मनोज जगझाप, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, अशोक मवाळ, प्रशांत घुले, वत्सलाबाई जाधव, इंदुबाई शिंदे, श्रावण आसणे, गंगाधर औताडे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे उपस्थित होते.