अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्यात रोलर पूजन समारंभ

अहिल्यानगर : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या आगामी ५१ व्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मिल रोलर पूजन चेअरमन राजेंद्र नागवडे, संचालक सावता हिरवे व प्रवीण लबडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस होते. कारखान्यामुळे श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट झाला आहे. तालुका वैभवाच्या शिखरावर उभा आहे. या सहकार गंगोत्रीचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ऊस उत्पादक सभासद, शेतकरी व कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केले.

व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस म्हणाले की, नागवडे कारखान्यावर सभासद शेतकऱ्यांचा विश्वास आहे. भविष्यातही ही संस्था भक्कमपणे उभी राहील याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. यावेळी भाऊसाहेब पडळकर, हनुमंत काळे व उत्तम दरेकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप देण्यात आला. संचालक भाऊसाहेब नेटके यांनी प्रास्ताविक केले. शरद जगताप यांनी आभार मानले. संचालक श्रीनिवास घाटगे, राकेश पाचपुते, प्रशांत दरेकर, योगेश भोईटे, डी. आर. काकडे, प्रा. सुरेश रसाळ, बंडू जगताप, संदीप औटी, दत्तात्रय कातोरे, सरपंच प्रवीण शिर्के, प्रा. भगवान शिर्के, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here