अहिल्यानगर : आर्थिक अडचणींवर मात करीत संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याने चालू गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी अधिकाधिक ऊस गाळपास देऊन हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले.
कारखान्याच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन ज्येष्ठ पत्रकार रावसाहेब निकळजे, बाळासाहेब खेडकर, अनिल कांबळे, उद्धव देशमुख, जयप्रकाश बागडे, इसाक शेख यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, ज्येष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, डॉ. प्रकाश घनवट, त्रिंबक चेमटे, शहाजी जाधव, मोहनराव दहिफळे, रमेश गर्जे, पोपट केदार, प्रवीण काळोशे, रामनाथ पालवे, तीर्थराज घुंगरड, अभिमन्यू विखे उपस्थित होते.


















