अहिल्यानगर : भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मकर संक्रांतिनिमित्त आयोजित सामुदायिक तिळगुळ वाटप कार्यक्रम झाला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी कारखान्यात गळितास येत असलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जाहीर करून त्याप्रमाणे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे. कारखान्याचा ऊस वजनकाटा पारदर्शक असून, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.
घुले पाटील म्हणाले की, आपला कारखाना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असून, दररोज १० हजार मेट्रिक टनाहून अधिक ऊस गाळप करण्याची क्षमता असल्याने सर्व उसाचे वेळेत गाळप पूर्ण होईल, त्यामुळे ऊस बाहेर देण्याची घाई करू नये. यावेळी काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, बबनराव धस यांनीही मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, संचालक काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, प्रा. नारायणराव म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, शिवाजीराव कोलते, सखाराम लव्हाळे, विकास नन्नवरे, दादासाहेब गंडाळ, माजी संचालक निवृत्ती दातीर, दिलीपराव मोटे, कार्यकरी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब गंडाळ यांनी आभार मानले.
















