अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची बुधवारी होणार सांगता

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाची सांगता दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील-घुले यांनी दिली. घुले म्हणाले की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर साखर कारखाना व सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. कमी ऊस आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही कारखान्याने सातत्याने चांगला भाव दिला आहे.

ते म्हणाले, सन २०२५-२६ या गळीत हंगामाची सांगता २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता माजी होणार आहेत. यावेळी आ. सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, डॉ. जयश्री थोरात, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, इंद्रजीत थोरात, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, अर्चना बालोडे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, गौरव डोंगरे, हैदर अली, सुभाष सांगळे, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊतयांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here