अहिल्यानगर : स्वामी समर्थ शुगर अँड ग्रो इंडस्ट्रीजसमोर शेतकरी संघटनेचे आंदोलन

अहिल्यानगर: वरखेड (ता. नेवासे) येथील स्वामी समर्थ शुगर अँड ग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्यासमोर शनिवारी दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेने आंदोलन केले. काही शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या उसाच्या वजनात तफावत दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, तो शेतकरी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची तीव्रता कमी झाली. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यानी या आंदोलनातून काढता पाय घेतला. ज्या शेतकऱ्याच्या उसाचे वजन कमी भरले, त्यांनीच कारखान्याबाबत काही तक्रार राहिलेली नाही, अशी भूमिका घेतली.

वरखेड कारखान्याच्या वजन काट्यात झालेला तांत्रिक घोटाळा दूर करण्यासाठी वजन मापे निरीक्षकांनी येथे येऊन एक वजन काटा सील केलेला आहे. वजनात झालेली तफावत कारखान्याने मान्य केली आहे. कारखान्याने आता काटा दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांसाठी संघटनेने आंदोलन केले, तेच शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. शेतकऱ्यांनी घुमजाव केल्यामुळे शेतकरी संघटनेने कारखाना व्यवस्थापनाला निवेदन दिले आणि आंदोलन आटोपते घेतले. या आंदोलनादरम्यान, पोलिस निरीक्षक महेश पाटील हे फौजफाटा घेऊन वरखेड येथे तळ ठोकून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here