अहिल्यानगर : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यावर्षीच्या हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण उसाचे २,७२३ रुपये प्रती मे. टनाप्रमाणे बिल दिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या बँक खात्यांमध्ये ७० कोटी रुपये रक्कम जमा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस लागवड होण्याचे दृष्टीने कारखाना शेतकी विभाग ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
संचालक राहुल राजळे यांनी सांगितले की, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भातील योजना विचारधीन आहे. कारखान्याचा आगामी गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी आवश्यक मशिनरी दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू आहे. कारखान्याने २०२५-२६ हंगामासाठी सहा लाख मे. टन गळिताचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गळीत हंगामामध्ये उसाची नोंद कारखान्याकडे नोंदणी करावी.ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन उपाध्यक्ष रामकिसन काकडे व संचालक मंडळाने केले.