अहिल्यानगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन २०२५-२६ या गळीत हंगामासाठी बसविण्यात येणाऱ्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील यांचे हस्ते झाले. सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात जास्तीत-जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, त्याच्या पूर्व तयारीचे दृष्टीने कारखाना मशिनरीचे ओव्हर ऑइलिंगची कामे जोमाने सुरू आहेत. तसेच ऊस तोडणी, वाहतूक मजूर भरतीचे काम ही प्रगती पथावर आहे. त्याचाच एक भाग असलेल्या मिल रोलरचे देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने तो बसविण्याचे काम सुरू करण्याप्रसंगी रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, काशिनाथ नवले, प्रा. नारायण म्हस्के, बबनराव भुसारी, भाऊसाहेब कांगुणे, जनार्दन कदम, शिवाजीराव कोलते, मच्छिद्र म्हस्के, पंडितराव भोसले, सखाराम लव्हाळे, शंकरराव पावसे, विकास ननवरे, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गुंजाळ, शिवाजीराव कोलते, भाऊसाहेब कांगुणे, डॉ. नारायण म्हस्के, विष्णूपंत जगदाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस. मुरकुटे, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, विलासराव लोखंडे, इब्राहिम सय्यद, नंदकुमार चोथे, मोहन दुधाळ, शशिकांत निपुंगे, रोहित मोटे, गोडावून किपर विवेक जगदाळे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, राजेंद्र काकडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.