प्रख्यात अब्जाधिश एलन मस्क यांच्या ट्विटवर जगभरातील लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यांनी एखादी घोषणा केली तर ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेत असते. गेल्या दोन दिवसांत जगातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीने कोका कोला कंपनीबाबत एका पाठोपाठ एक ट्वीट केले आहे. सरुवातीला त्यांनी कोका-कोला खरेदी करण्याबाबत चेष्टेच्या सुरात ट्वीट केले होते. आणि आता दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी स्लोगनविषयी म्हटले आहे.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार एलन मस्क यांनी गुरुवारी ट्वीट केले होते की ते कोका-कोला कंपनी खरेदी करतील. कारण त्यामधील कोकीन परत मिळू शकेल. आता त्यांनी एक नवे स्लोगन ट्विट केले असून ते ट्रेंडमध्ये आले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘खऱ्या आनंदापासून फक्त एक सीप लांब’. अर्थात या ट्विटसोबत त्यांनी एक हास्य इमोजीही ट्वीट केला आहे. त्यातून लोकांना ते चेष्टा करीत असल्याचे दिसून आले आहे.
कोका-कोलाच्या ट्विटवर लोकांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. काही तासातच त्यांचे ट्विट २४,००० हून अधिक वेळा रिट्विट केले गेले. तर १७ हजार लोकांनी त्याला रिप्लाय दिले आहे. एलन मस्क यांच्या ट्विटर हँडलवर सध्या ८८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर आहेत. ते आपल्या ट्विटर अकाउंटवर खूप सक्रिय असतात.











