मेरठ : सध्याच्या गळीत हंगामात अद्याप ऊस दर जाहीर झालेला नाही. त्यामुळे तातडीने दर निश्चिती केली जावी अशी मागणी भाकियू संघटनेच्या सदस्यांच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीत शेतकरी नेते राजकुमार यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात गाळप सुरू झाले आहे. तरीही अद्याप जर जाहीर केलेला नाही.
लाइव्ह हिंदूस्थानमधील वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी ४५० रुपये प्रती क्विंटल ऊस दराची मागणी केली आहे. सध्या महागाई गगनाला भीडली आहे. आणि सरकार ऊस दरवाढीस तयार नसल्याचे दिसते. काही कारखान्यांनी गेल्या हंगामातील ऊस बिले दिलेली नाहीत. प्रशासनाकडे सातत्याने थकबाकीची मागणी केली जात आहे. मात्र, फक्त आश्वासने दिली जातात. लवकरात लवकर बिले दिली नाहीत आणि दर निश्चिती झाली नाही, तर शेतकरी संघटना आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.















