सिंगापूर : भारताची एचपीसील-मित्तल एनर्जी लिमिटेड (HMEL) {HPCL-Mittal Energy} आपल्या कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या उपायांतर्गत २०२३ मध्ये उत्तर भरतामधील आपल्या भटिंडा रिफायनरीमध्ये बायो इथेनॉल प्लांट सुरू करणार आहे. एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेडचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण शिर्के यांनी एशिया पॅसिफिक पेट्रोलियम परिषदेत सांगितले की, आमची कंपनी खराब अन्नासह कृषी उत्पादनांवर आधारित प्रती वर्ष १,००,००० टन इथेनॉल प्लांट सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.
रॉयटर्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, प्लांट पुढील वर्षी सुरू होईल. HMEL हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (एचपीसीएल.एनएस) आणि मित्तल एनर्जी इन्व्हेस्टमेंट्स यांदरम्यानचा एक संयुक्त उद्योग आहे. भारताच्या धोरणानुसार, पुढील वर्षी एप्रिल महिन्यात देशातील काही भागात पेट्रोलसह २० टक्के इथेनॉल मिश्रण सुरू केले जाणार आहे. त्यानंतर २०२५-२६ मध्ये त्याची देशभर अंमलबजावणी होईल.














