बरेली : ऊस विभागाच्या उपायुक्तांनी केसर साखर कारखान्याशी संलग्न गावांतील ऊस सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी केली. ऊस उपायुक्त राजीव राय यांनी शेतकऱ्यांना ऊसाची लागवड पिट डिगर पद्धतीने करण्याचा सल्ला दिला. ही पद्धत अधिक उत्पादन मिळवून देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आपल्या पाहणी दौऱ्यावेळी ऊस उपायुक्तांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. लागवडीच्या या नव्या पद्धतीत ऊस बांधून ठेवावा लागत नाही, असे त्यांनी सांगितले. शहराजवळच असलेल्या गोपालपूर गावात जावून त्यांनी शेतकरी किशन पाल यांच्या शेतातील सर्व्हेची पाहणी केली. मुंडीया मुकर्रमपूर येथे शेतकरी जाहीद अली आणि इम्रान यांच्या शेतालाही भेट दिली. शेतकऱ्यांना सर्व्हेवेळीच स्लीप दिली जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ऊस समितीचे सचिव राजीव सेठ, केसर सारखर कारखान्याचे सहाय्यक ऊस उपाध्यक्ष रावेंद्र सिंह, ऊस विभागाचे महाव्यवस्थापक सुभाष तोमर, ऊस पर्यवेक्षक शहादत हुसेन, अशोक कुमार सिंह, मयंक पुरोहित आदी उपस्थित होते.













