महराजगंज : शेतकऱ्यांनी ऊस बियाण्यांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश संशोधन संस्थेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेश ऊस संशोधन केंद्राने बियाण्यांच्या उपलब्धता केली आहे. वसंत ऋतुमधील ऊस लागण करीत असलेल्या शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी संपर्क साधावा. सिसवा ऊस विकास परिषद आणि घुघली कार्यालय येथे शेतकऱ्यांसाठी हे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.












