दिसपूर : आसामच्या मंत्रिमंडळाने आसाम इथेनॉल प्रॉडक्शन प्रमोशन पॉलिसी २०२१ यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती आसामचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री चंद्रमोहन पटोवरी यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री पटोवरी यांनी सांगितले की, हे धोरण ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध ठरेल. आसाम हे इथेनॉल धोरण प्रस्तावित करणारे देशातील दुसरे राज्य आहे.
ते म्हणाले, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने ऊर्जा तसेच परिवर्तनाच्या क्षेत्रात जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी जैव इंधन धोरण २०१८ ची रचना केली आहे. त्यामुळे राज्यात सर्व ठिकाणी इथेनॉल प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. संभाव्य गुंतवणूकदारांना आर्थिक प्रोत्साहन देऊन इंधन ग्रेड स्टँड अलोन ग्रीन फिल्ड इथेनॉल निर्मिती युनिट स्थापन करण्यास चांगले वातावरण निर्माण केले जाईल.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निश्चित केले आहे. देशातील इथेनॉल उत्पादक प्रमुख राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉलमध्ये ९.८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. १२ जुलै रोजी देशातील सरासरी इथेनॉल मिश्रण ७.९३ टक्के आहे. कर्नाटकमध्ये ९.६८ टक्के, महाराष्ट्रामध्ये ९.५९ टक्के, बिहारमध्ये ९.४७ टक्के मिश्रण करण्यात आले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link
















