बिजनौर : ऊस विकास परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात उसावर पडणाऱ्या विविध रोगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उसावरील अनेक रोगांपासून पिकाचा बचाव कसा करावा याची माहिती देण्यात आली.
खेडकी गावात रामपाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना मुरादाबादच्या ऊस संशोधन परिषदेचे सहाय्यक ऊस संचालक मनोज श्रीवास्तव यांनी उसावरील लाल सड रोग, पोक्का बोईंग, पॉयीरला, ग्रास हॉपर, टॉप बोरर आदी रोगांबाबत माहिती देऊन त्या पासून बचावाचे उपाय सांगण्यात आले.
साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक ललित कुमार तोमर यांनी शेतकऱ्यांना को ०२३८ प्रजातीवर प्रादुर्भाव होणाऱ्या रोगापासून बचाव करण्यासाठी को ०११८, को १५०२३ यांची लागवड करण्याचे आवाहन केले. पोक्का बोईंग रोगाला आळा घालण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने कॉपर ऑक्सिक्लोराईड पानांवर फवारावे, किटकनाशकांचा वापर कसा करावा याची माहिती त्यांनी दिली.
ऊस विकास निरीक्षक विरेंद्र नाथ यांनी सर्वेक्षणातील नोंदी आणि ईआरपी प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती भरण्याविषयी मार्गदर्शन केले. सर्व शेतकऱ्यांनी संबंधीत घोषणापत्र भरावे असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात जितेंद्र कुमार, संजीव कुमार त्यागी, नाजिम अली, कलीम अहमद, आबिद, सत्पाल जितेंद्र सिंह, अनिल यादव यांची भाषणे झाली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link












