ढाका : रमजानच्या आगामी उपवासाच्या महिन्यादरम्यान कमोडिटीच्या किमती सामान्य स्थितीत ठेवण्यासाठी साखरेवरील आयात शुल्क कपात करावी आणि कारखान्यांमध्ये पुरेसा गॅस पुरवठा करावा असे आवाहन रिफायनर्सनी केले आहे.
सद्यस्थितीत साखर आयातीवर नियामक शुल्क ३० टक्के आहे. मेघना ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे वरिष्ठ सहायक महाव्यवस्थापक तस्लीम शहरियार यांनी सांगितले की, आधी, साखरेची आयात ४३०-४५० डॉलर प्रती टन दराने केली जात होती. मात्र, आता ही आयात ५१०-५३० डॉवर प्रती टन दराने केली जात आहे. यानंतर बांगलादेशातील साखरेच्या किमती आठ वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.
त्यांनी सांगितले की, दर सुधारणेशिवाय साखरेच्या किमती कोणत्याही प्रकारे कमी केल्या जावू शकत नाहीत. बैठकीत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले की, रिफाईंड साखरेची निर्धारीत किमतीच्या तुलनेत अधिक किमतींवर विक्री होत आहे. कारण कारखानदार त्यांच्याकडून अधिक दर वसूल करीत आहेत. बांगलादेश होलसेल इडिबल ऑइल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम मावला यांनी सांगितले की, कारखानदार आम्हाला एका दराची पावती देत आहेत आणि आमच्याकडून दुसरा दर वसूल केला जात आहे. जर आम्ही याविषयी काही बोललो तर आम्हाला कारखान्यांच्या गेटमधून पुन्हा आत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, कारखानदारांनी या आरोपांचा इन्कार केला.















