बीड : गंगा माऊली शुगर कारखान्याचे मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम साखर कारखान्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, उपाध्यक्ष हनुमंत मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, संचालक प्रवीण मोरे, अविनाश मोरे, पशुपतीनाथ दांगट, आप्पासाहेब ईखे, प्रविणकुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे, मुन्ना ठोंबरे, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. आय. मुजावर, मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडला. यावेळी आदित्य पाटील यांनी आगामी गळीत हंगामात साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालून आतापर्यंतचा गाळपाच्या उच्चांक गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष हनुमंत मोरे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास व हमीभावाविषयी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचे प्रयत्न गतीने सुरू असल्याचे सांगितले. साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजन कार्यक्रमास कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते. आगामी गळीत हंगामात साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे असे सांगण्यात आले.