बीड : जिल्ह्यातील ऊस उत्पादक वळले कांदा लागवडीकडे, आष्टी तालुक्यातील चित्र

बीड : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात यंदा कांद्याच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी ऊस लागवड होत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांदा लागवडीकडे मोर्चा वळवला आहे. तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील कांद्याची लागवड झाली असून एकूण सुमारे ७५ हजार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा रब्बी हंगामातील कांद्याची विक्रमी लागवड झाल्याचे चित्र आहे. मात्र, उत्पादन वाढीच्या तुलनेत बाजारभाव टिकून न राहिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या पीक बदलाची जाणीव कृषी विभागालाही झाली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे म्हणाले की, यंदा आष्टी तालुक्यात गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. जवळपास ३० हजार हेक्टर म्हणजेच सुमारे ७५ हजार एकर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. पीक लागवडीचा पॅटर्न बदलताना दिसत आहे. दरम्यान, उत्पादन वाढले असले तरी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाचा कांदा १० ते १२ रुपये, तर काही ठिकाणी १५ ते १६ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मात्र हे दर मोजक्याच शेतकऱ्यांना मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here